सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती; व्यंकटराव हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती; व्यंकटराव हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न

आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,

वन्यजीव सप्ताह २०२६ च्या निमित्ताने वनविभाग आजरा यांच्या वतीने स्थानिक व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वन्यजीव व सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, सापांविषयीचे गैरसमज दूर करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

​सदर कार्यक्रमाचे आयोजन आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील होते.

​कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक व निसर्ग मार्गदर्शक विकास माने यांनी “साप, सापांच्या प्रजाती, समज व गैरसमज” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सापांच्या विविध प्रजातींची ओळख, समाजातील गैरसमज आणि परिसरात साप आढळल्यास कोणती काळजी घ्यावी, याचे सविस्तर विश्लेषण केले. कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक विजय पाटील यांनी “मानव व वन्यजीव संघर्ष” या विषयावर बोलताना संघर्षाची मूळ कारणे, सुरक्षिततेचे उपाय आणि संवर्धनात सर्वसामान्य नागरिकांचे योगदान यावर प्रकाश टाकला.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उत्तर आजरा परिमंडळ वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी केले. त्यांनी वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची आजच्या काळातील गरज विषद केली.

​याप्रसंगी परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वनरक्षक प्रियांका पाटील, संगीता राठोड, सरिता बावस्कर, वनसेवक कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, सुरेश पताडे यांच्यासह वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य राहुल गवळी, समीर केरकर, साहिल डेळेकर, विनायक पताडे, अक्षय पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पारळे यांनी केले, तर प्रा. महादेव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT