सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आजरा शाखा व्यवस्थापकांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय मदत मंजूर

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आजरा शाखा व्यवस्थापकांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय मदत मंजूर
“

अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांनी सांगितले की, "संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात नेहमी पाठीशी उभे राहण्याची जोल्ले ग्रुपची परंपरा आहे.

आजरा / प्रतिनिधी: गोपाळ गडकरी,

सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी कल्याणासाठी अग्रेसर असलेल्या जोल्ले ग्रुप संचलित 'श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एक्संबा (मल्टी-स्टेट)'च्या आजरा शाखेचे व्यवस्थापक श्री. दत्तात्रय सुतार यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयाकडून वैद्यकीय मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीच्या मंजुरीचे अधिकृत पत्र शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते श्री. सुतार यांना सुपूर्द करण्यात आले.

​यासंदर्भात माहिती देताना शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांनी सांगितले की, "संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात नेहमी पाठीशी उभे राहण्याची जोल्ले ग्रुपची परंपरा आहे. या शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी जोल्ले ग्रुपचे संस्थापक, माजी खासदार तथा बेळगावी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब जोल्ले आणि सहसंस्थापिका, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी तत्परतेने विशेष सहकार्य केले."

​या पत्र वितरणप्रसंगी सोसायटीचे संचालक सुरेश मिटके, महेश कुरुणकर, सुशांत निकम, तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे तसेच विठोबा मंदिर नबापूरचे ट्रस्टी समीर मोरजकर यांच्यासह इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. संकटसमयी संस्थेकडून मिळालेल्या या आर्थिक पाठबळाबद्दल शाखा व्यवस्थापक सुतार यांनी जोल्ले कुटुंबीय व संचालक मंडळाचे आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT