सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजरा हायस्कूलमध्ये ‘हादगा बोळवण’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा हायस्कूलमध्ये ‘हादगा बोळवण’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
“

डॉ. गौरी भोसले यांनी विद्यार्थिनींना ‘सोशल मीडिया आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

आजरा (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये ‘हादगा बोळवण’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.

​कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत हादगा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवर, महिला आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक हादगा फेर धरत आनंद लुटला. याप्रसंगी हादग्यानिमित्त सुगम हादगा गीत गायन स्पर्धा तसेच ‘टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थिनींनी या वेळी सुश्राव्य हादगा गीतेही सादर केली.

​कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. गौरी भोसले यांनी विद्यार्थिनींना ‘सोशल मीडिया आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करत समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करण्याचा सल्ला दिला. सौ. एस. डी. भालेराव यांनी हादगा व भोंडल्याच्या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व विशद केले, तर कुमारी वेदिका विजय पोद्दार हिनेही हादगा परंपरेविषयी माहिती मांडली. अध्यक्षीय भाषणात सौ. शितल कुरुणकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. टी. एस. पाटील यांनी केले. सौ. व्ही. पी. हरेर यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. एम. एस. शेलार यांनी केले, तर सौ. एम. एस. कांबळे यांनी आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मनोरंजन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!
महाराष्ट्र

परंपरेच्या रंगात रंगली शाळा!

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न

ANCHOR AD SLOT