सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार
“

सध्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या मोबाईल अरेस्ट (डिजिटल अरेस्ट), सायबर फसवणूक व आर्थिक लुटीबाबत सजगता निर्माण करणे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी: गोपाळ गडकरी

समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना आळा घालणे, ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची काळजी घेणे आणि सध्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या मोबाईल अरेस्ट (डिजिटल अरेस्ट), सायबर फसवणूक व आर्थिक लुटीबाबत सजगता निर्माण करणे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

​या कार्यक्रमाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हा सत्कार महासंघाचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

​याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस प्रशासनाने सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या क्लृप्त्या उघड केल्या. "डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना भीती दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते. अशा कोणत्याही संशयास्पद कॉल्स अथवा धमक्यांना ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात घाबरू नये, तातडीने कुटुंबीय आणि पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गावातील व परिसरातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा सूर मान्यवरांनी लावून धरला.

​या सोहळ्यास मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, उपजिल्हाध्यक्ष सी. आर. देसाई, आजरा तालुकाध्यक्ष शंकरराव शिंदे, कार्याध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव संभाजीराव इंजल यांच्यासह प्रकाशराव देसाई, पावले सर, सी. डी. देसाई, राजू सावंत, सूर्यकांत आजगेकर, भाऊ निर्मळे, दत्ताजीराव मोहिते, महादेव पवार, शिवाजीराव इंजल आणि महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT