सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग

संपादक - गोपाळ गडकरी

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग
“

हत्तीच्या भव्य रांगोळीभोवती विद्यार्थिनींनी धरला फेर; लोकोत्सवातून सांस्कृतिक मूल्यांची जपणूक

आजरा: प्रतिनिधी,

येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये परंपरेचा वारसा जपणारा 'हादगा बोळवण' समारंभ मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. कलाशिक्षक श्रीकृष्णा दावणे यांनी प्रशालेच्या मैदानावर साकारलेली हत्तीची भव्य व देखणी रांगोळी या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. या रांगोळीभोवती इयत्ता सहावी व आठवीच्या सुमारे ४५० विद्यार्थिनींनी शिक्षिकांसमवेत फेर धरत हादग्याची पारंपरिक गाणी सादर केली.

​याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित असलेल्या विद्यामंदिर हसूरवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पावती जयवंत दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व प्रसारमाध्यमांचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम, सायबर सुरक्षितता, संधी आणि आव्हाने यावर त्यांनी प्रकाश टाकला. "विद्यार्थी ही आजऱ्याच्या लाल मातीची खरी दौलत असून त्यांनी पालकांचा आदर करावा तसेच सदसद्विवेकबुद्धी आणि कार्यकारणभावाची सांगड घालून प्रसारमाध्यमांचा जबाबदारीने वापर करावा," असा मौलिक संदेश त्यांनी दिला.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अलका जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांगितले की, "आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शालेय जीवनापासूनच अशा लोकोत्सवांचे आयोजन होणे गरजेचे आहे."

​या कार्यक्रमास संस्थेच्या सदस्या सौ. आशा सचिन शिंपी, प्राचार्य एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे, सौ. एस. टी. पाटील, सौ. व्ही. ए. वडवळेकर, सौ. ए. एस. गुरव, श्रीमती एम. व्ही. बिल्ले, श्रीमती एम. एम. शिप्पूरकर, सौ. एस. वाय. देसाई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

​कार्यक्रमाचा अतिथी परिचय श्रीमती एस. के. कुंभार यांनी करून दिला. श्रीमती आर. एन. पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर सौ. ए. डी. पाटील यांनी आभार मानले.

संपादक - गोपाळ गडकरी

संपादक - गोपाळ गडकरी

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने
महाराष्ट्र

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव
अर्थव्यवस्था

तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन
अर्थव्यवस्था

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

ANCHOR AD SLOT