सारथी महाराष्ट्राचा ई-पेपर
मनोरंजन

मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन

संपादक - गोपाळ गडकरी • 12 October 2026, 04:42 PM

मडिलगे:

येथील श्री दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १५ वर्षांवरील सर्व महिलांसाठी भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी (आश्विन शु. ५, शके १९४८) दुपारी ठीक ३ वाजता मडिलगे येथे पार पडणार आहे.

​मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात. यंदा कुलस्वामिनीच्या चरणी श्रद्धा व भक्तीभावाने कुंकू अर्पण करून आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

​या कुंकुमार्चन सोहळ्यासाठी नाममात्र ५१ रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, परिसरातील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ७३८७०६९९७९ किंवा ९०६७८९९०९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)