# सारथी महाराष्ट्राचा — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## आजरा हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषेत 'शाही दसरा मेळावा' उत्साहात संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-hayasakalmathhaya-paraparaka-vashabhashhata-shaha-thasara-maliva-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-12 19:43 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी) :येथील जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये विजयादशमी व दसऱ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष 'शाही दसरा मेळावा' आणि पारंपरिक वेशभूषा उपक्रमाचे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.​या उपक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आणि मराठमोळ्या अस्सल पोशाखात विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण शाळा परिसर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिक्षकांनीही पारंपरिक पोषाख परिधान करून या महोत्सवाची शोभा अधिक वाढवली.​विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समृद्ध भारतीय संस्कृती, सण आणि ऐतिहासिक मूल्यांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच त्यांना सांस्कृतिक वारशाची सखोल ओळख व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.​कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी आणि पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे हा शाही दसरा मेळावा अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. --- ## लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक; उद्या छत्रपती संभाजी चौकात निदर्शने - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/lkashaha-aanae-savathhana-vacavanaeyasatha-aajariyata-mahavakasa-aaghada-aakaramaka-uthaya-chhatarapata-sabhaja-cakata-natharashana - **Published**: 2026-10-12 17:22 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा : प्रतिनिधी,मतदार याद्यांचे संशयास्पद पुनर्निरीक्षण आणि कथित मतचोरीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना मदत करणाऱ्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या तरुणाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १३ रोजी छत्रपती संभाजी चौकात भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.​देशभरात शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर पोलीस बळाचा गैरवापर करून त्यांना हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले जात आहे. केंद्र व राज्य सरकारची ही दडपशाही लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारी असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या निर्भीड तरुणाईच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी आहे," हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.​सरकारची ही दडपशाही मोडून काढण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय घटकांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. --- ## मडिलगे येथे १५ ऑक्टोबरला भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळा; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/madalga-yatha-oikatabral-bhavaya-samahaka-kakamaracana-sahali-mahalna-upasathata-rahanaeyaca-aavahana - **Published**: 2026-10-12 16:42 - **Category**: मनोरंजन - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी मडिलगे:येथील श्री दुर्गामाता सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १५ वर्षांवरील सर्व महिलांसाठी भव्य सामूहिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी (आश्विन शु. ५, शके १९४८) दुपारी ठीक ३ वाजता मडिलगे येथे पार पडणार आहे.​मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात. यंदा कुलस्वामिनीच्या चरणी श्रद्धा व भक्तीभावाने कुंकू अर्पण करून आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.​या कुंकुमार्चन सोहळ्यासाठी नाममात्र ५१ रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, परिसरातील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ७३८७०६९९७९ किंवा ९०६७८९९०९० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे. --- ## परंपरेच्या रंगात रंगली शाळा! - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/paraparacaya-ragata-ragal-shali - **Published**: 2026-10-12 09:41 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी चंदगड (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील ‘दि न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये पारंपरिक वेशभूषा दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण पोशाख परिधान करून सहभाग घेतला.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य आर. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केले. "अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची, लोकपरंपरांची आणि सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख होते," असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात केले.​या उपक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, विविध संतांच्या भूमिका तसेच कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा साकारल्या होत्या. पारंपरिक पोशाखांमुळे संपूर्ण शाळा परिसर सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला होता.​ग्रंथपालांची धनगरी वेशभूषा ठरली विशेष आकर्षणविद्यार्थ्यांसोबतच शाळेचे ग्रंथपाल शरद हदगल यांनी परिधान केलेली अस्सल धनगरी वेशभूषा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. पांढरा पारंपरिक पोशाख, डोक्यावर मुंडासे आणि कमरेला लाल पट्टा अशा पारंपरिक थाटात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या वेशभूषेचे सर्व उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.​या कार्यक्रमास उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. जी. साबळे, शिक्षक जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## आजरा हायस्कूलमध्ये ‘हादगा बोळवण’ कार्यक्रम उत्साहात संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-hayasakalmathhaya-hathaga-blivanae-karayakarama-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-11 02:33 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये ‘हादगा बोळवण’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.​कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत हादगा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवर, महिला आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक हादगा फेर धरत आनंद लुटला. याप्रसंगी हादग्यानिमित्त सुगम हादगा गीत गायन स्पर्धा तसेच ‘टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थिनींनी या वेळी सुश्राव्य हादगा गीतेही सादर केली.​कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. गौरी भोसले यांनी विद्यार्थिनींना ‘सोशल मीडिया आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करत समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करण्याचा सल्ला दिला. सौ. एस. डी. भालेराव यांनी हादगा व भोंडल्याच्या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व विशद केले, तर कुमारी वेदिका विजय पोद्दार हिनेही हादगा परंपरेविषयी माहिती मांडली. अध्यक्षीय भाषणात सौ. शितल कुरुणकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. टी. एस. पाटील यांनी केले. सौ. व्ही. पी. हरेर यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. एम. एस. शेलार यांनी केले, तर सौ. एम. एस. कांबळे यांनी आभार मानले. --- ## आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मंगळवारी आजऱ्यात जाहीर व्याख्यान - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aatharasha-sarapaca-bhasakararava-para-patal-yaca-magalivara-aajariyata-jahara-vayakhayana - **Published**: 2026-10-10 16:11 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्यानाचे आयोजन. ​आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी, ग्रामीण विकासाचे दिशादर्शक, परखड वक्ते आणि राज्याला विकासाचा वस्तुपाठ घालून देणारे आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे जाहीर व्याख्यान मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता आजरा येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ​केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता लोकसहभाग, शिस्त, पारदर्शक कारभार आणि योग्य नियोजनातून गावाची कायापालट कशी करता येते, हे भास्करराव पेरे-पाटील यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि अस्सल ग्रामीण शैलीतील प्रभावी मांडणीमुळे राज्यभरात त्यांच्या व्याख्यानांना मोठा प्रतिसाद मिळतो. ​या व्याख्यानातून ते ग्रामीण भागातील ज्वलंत समस्या, ग्रामविकासातील अडचणी व त्यावरील व्यवहार्य उपाय, विविध शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, समाजकारण आणि विशेषतः तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक असलेला व्यसनमुक्तीचा विचार अशा विविधांगी पैलूंवर परखड भाष्य करणार आहेत. लोकसहभागातून समृद्ध गावांची निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन हा त्यांच्या मांडणीचा मुख्य गाभा असेल. ​"उत्सवाला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक प्रबोधनाची जोड देणे काळाची गरज आहे. भास्करराव पेरे-पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आजरा परिसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, तरुण आणि ग्रामविकासात रस असणाऱ्या प्रत्येकाला व्हावा, हाच या आयोजनामागील हेतू आहे." — शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, आजरा ​या व्याख्यानाला तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचारमंथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. --- ## बापूसाहेब सरदेसाई हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' उत्साहात; रानफुले-भाज्यांच्या आराशीतून जपली लोकसंस्कृती - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/bpasahab-sarathasaii-hayasakalmathhaya-hathaga-blivanae-utasahata-ranafal-bhajayacaya-aarashatana-japal-lkasasakata - **Published**: 2026-10-10 15:56 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी गवसे (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी, महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि कृषी संस्कृतीचा अनमोल वारसा जपत, येथील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' कार्यक्रम अत्यंत उत्साही, मांगल्याच्या व चैतन्यमय वातावरणात दिमाखात पार पडला. ​कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. चंद्रकांत घुणे सर यांच्या हस्ते विधिवत हादगापूजनाने झाला. यावेळी निसर्गातील विविध रानफुले आणि ताज्या भाज्यांची आकर्षक सजावट करून हत्तीभोवती निसर्गरम्य आरास साकारण्यात आली होती. रानफुले व भाज्यांचा वैशिष्ट्यपूर्ण हार अर्पण करत श्री. घुणे सरांनी शेतकऱ्यांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते उलगडून दाखवले. ​"शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धीची भरभराट व्हावी, हत्तीच्या सोंडेसारखा दमदार पाऊस पडून धरणीमाता सुपीक व्हावी आणि शेतामध्ये हत्तीसारखे विपुल धान्य पिकावे," अशी प्रार्थना यावेळी निसर्गाकडे करण्यात आली. पुराणात व चित्रात ज्याप्रमाणे हत्ती आणि लक्ष्मीचे अढळ स्थान एकत्र दिसते, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी सदैव नांदावी आणि बळीराजाचे घर-अंगण धनधान्याने भरून जावे, अशी कृतज्ञ भावना व्यक्त झाली. ​पूजनानंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक हादग्याची लोकगीते घुमली. विद्यार्थिनींनी तालासुरात गाणी गात फेर धरला, ज्यामुळे परिसर पारंपरिक उत्साहाने न्हाऊन निघाला. गाण्यांनंतर मुलींमध्ये रंगलेली 'खिरापत' ओळखण्याची चुरस विशेष आकर्षण ठरली. खिरापत ओळखल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ​या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थिनींना सौ. सुमित्रा ढेकळे, श्री. अशोक महाजन सर, श्री. रवि भालेकर सर, श्री. संदीप वाटवे आणि सौ. अंजना कांबळे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी श्री. प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ​शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा लोकोत्सव अविस्मरणीय व देखणा ठरला. --- ## धनंजय विद्यालय नागणवाडी येथे ‘वन ज्ञान’ स्पर्धेने वन्यजीव सप्ताहाची सांगता; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/thhanajaya-vathayalya-naganaevada-yatha-vana-janiana-saparathhana-vanayajava-sapatahaca-sagata-vathayarathayaca-utasafarata-paratasatha - **Published**: 2026-10-10 13:52 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी नागणवाडी (चंदगड): प्रतिनिधी,सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर अंतर्गत वनपरिक्षेत्र चंदगड यांच्या वतीने आयोजित 'वन्यजीव सप्ताह २०२६' ची सांगता धनंजय विद्यालय नागणवाडी येथे उत्साहात पार पडली. या सांगता समारंभाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या 'वन ज्ञान' स्पर्धेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पर्यावरण ज्ञानाची चुणूक दाखवली.​या स्पर्धेत संस्कृती मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अनुष्का नेवगे (द्वितीय), शौर्य दोरुगडे (तृतीय), ऋतिका वाके (चौथा) आणि राजवीर मगदूम (पाचवा) यांनी अनुक्रमे यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि शालेय साहित्याचे वाटप करून गौरविण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले.​याप्रसंगी मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी निसर्ग, पर्यावरण, वने व वन्यजीवांचे रक्षण याविषयी विद्यार्थ्यांचे कर्तव्य, संस्कार आणि संस्कृती यावर प्रेरणादायी विचार मांडले. वनपाल सौ. माणिक खोत यांनी विद्यार्थिनींना वनसेवेतील करिअरच्या विविध संधींविषयी सविस्तर माहिती दिली.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य एस. एम. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एच. आर. पावसकर यांनी केले, तर आभार एस. जे. पाटील यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर बांदिवडेकर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.​यावेळी वनपाल सलीम मुल्ला, वनरक्षक जालिंदर गावडे, अरुण सांगळे, वनसेवक पांडुरंग खापरे, रवी पाटील आणि श्रीकांत तराळ उपस्थित होते.​तालुक्यात विविध उपक्रमांची रेलचेलऑक्टोबरचा पहिला आठवडा जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी किशोरकुमार येळे व सहायक वनसंरक्षक स्नेहल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंदगडचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून चंदगड व आजरा तालुक्यांतील विविध शाळांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य आणि वन ज्ञान स्पर्धांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून वन विभागाच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. --- ## आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये 'हादगा बोळवण' समारंभ उत्साहात; साडेचारशे विद्यार्थिनींचा सहभाग - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajariyacaya-vayakatarava-hayasakalmathhaya-hathaga-blivanae-samarabha-utasahata-sadacarasha-vathayarathanaca-sahabhaga - **Published**: 2026-10-10 13:41 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा: प्रतिनिधी,येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये परंपरेचा वारसा जपणारा 'हादगा बोळवण' समारंभ मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. कलाशिक्षक श्रीकृष्णा दावणे यांनी प्रशालेच्या मैदानावर साकारलेली हत्तीची भव्य व देखणी रांगोळी या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. या रांगोळीभोवती इयत्ता सहावी व आठवीच्या सुमारे ४५० विद्यार्थिनींनी शिक्षिकांसमवेत फेर धरत हादग्याची पारंपरिक गाणी सादर केली.​याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित असलेल्या विद्यामंदिर हसूरवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पावती जयवंत दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व प्रसारमाध्यमांचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम, सायबर सुरक्षितता, संधी आणि आव्हाने यावर त्यांनी प्रकाश टाकला. "विद्यार्थी ही आजऱ्याच्या लाल मातीची खरी दौलत असून त्यांनी पालकांचा आदर करावा तसेच सदसद्विवेकबुद्धी आणि कार्यकारणभावाची सांगड घालून प्रसारमाध्यमांचा जबाबदारीने वापर करावा," असा मौलिक संदेश त्यांनी दिला.​कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अलका जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांगितले की, "आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शालेय जीवनापासूनच अशा लोकोत्सवांचे आयोजन होणे गरजेचे आहे."​या कार्यक्रमास संस्थेच्या सदस्या सौ. आशा सचिन शिंपी, प्राचार्य एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे, सौ. एस. टी. पाटील, सौ. व्ही. ए. वडवळेकर, सौ. ए. एस. गुरव, श्रीमती एम. व्ही. बिल्ले, श्रीमती एम. एम. शिप्पूरकर, सौ. एस. वाय. देसाई यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.​कार्यक्रमाचा अतिथी परिचय श्रीमती एस. के. कुंभार यांनी करून दिला. श्रीमती आर. एन. पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर सौ. ए. डी. पाटील यांनी आभार मानले. --- ## आजऱ्यात अमृत जल योजनेवरून १३ नगरसेवक आक्रमक; पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत ठेकेदाराची देयके रोखण्याची मागणी - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajariyata-amata-jal-yajanavanprna-nagarasavaka-aakaramaka-panaeparavatha-saralita-haiiparayata-thakatharaca-thayaka-rakhanaeyaca-maganae - **Published**: 2026-10-10 12:43 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा:आजरा शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी 'अमृत जल योजने'चे काम दोन वर्षे उलटूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आणि सर्व नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केल्याशिवाय ठेकेदाराची कोणतीही देयके अदा करू नयेत, अशी आक्रमक भूमिका आजरा नगरपंचायतीच्या १३ नगरसेवक व नगरसेविकांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.​नदीवरील मुख्य पाणी उपसा केंद्रावर वारंवार मोटारी नादुरुस्त होणे व जळण्याचे प्रकार घडत असल्याने आजरा शहराला सातत्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. योजनेअंतर्गत नदी उपसा केंद्रासाठी ५० एच.पी. क्षमतेच्या दोन मोटारी (एक मुख्य व एक स्टँडबाय) आवश्यक आहेत. मात्र, संपूर्ण शहराचा वाढता विस्तार पाहता ही क्षमता पुरेशी नसून अतिरिक्त ३० एच.पी. क्षमतेची मोटार स्टँडबाय स्वरूपात तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.​कामांची प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणी करायोजनेचे काम कागदावर पूर्ण दाखवण्यापूर्वी नगरपंचायतीने प्रत्यक्ष पाहणी करून शहरातील सर्व भागांत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पोहोचते आहे का, याची खात्री करावी. कोट्यवधींचा निधी खर्चूनही जर नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असेल, तर या कामांच्या गुणवत्तेची व कार्यक्षमतेची सखोल तांत्रिक तपासणी आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले.​नगरसेवकांच्या प्रमुख चार मागण्या:​शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ठेकेदाराचे उर्वरित कोणतेही देयक अदा करू नये.​पाणी उपसा केंद्रावर आवश्यक क्षमतेसह ३० एच.पी.ची अतिरिक्त स्टँडबाय मोटार उपलब्ध करण्याचे ठेकेदारास सक्त आदेश द्यावेत.​योजनेतील सर्व यंत्रणा व कामांची उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी पूर्ण करून घ्यावी.​सर्व प्रभागांत पुरेशा दाबाने पाणी सुरू झाल्याची खात्री पटल्यानंतरच अंतिम देयकाचा निर्णय घ्यावा.​१३ नगरसेवकांची स्वाक्षरीया निवेदनावर नगरसेवक अभिषेक शिंपी, परशूराम बामणे, मुसासर्फराज पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी, डॉ. सौ. स्मिता कुंभार, श्रीमती कलावती कांबळे, सौ. अश्विनी चव्हाण, सौ. आसावरी खेडेकर, रहिमतबी खेडेकर, सौ. निशात चॉंद, श्री. विक्रम पटेकर आणि डॉ. इंद्रजीत देसाई यांच्या सह्या आहेत. नगरसेवकांच्या या एकमुखी व ठाम भूमिकेमुळे नगरपंचायत प्रशासनावर ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे. --- ## एरंडोळ हायस्कूलमध्ये ‘भोंडला’ उत्साहात साजरा; राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंचा गौरव - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/eradali-hayasakalmathhaya-bhadal-utasahata-sajara-rashhataraya-va-rajayasataraya-ganaevata-khalidaca-garava - **Published**: 2026-10-09 15:41 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी एरंडोळ (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरीएरंडोळ हायस्कूल, एरंडोळ येथे भारतीय संस्कृती व लोकपरंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘भोंडला’ (हादगा) महोत्सवाची सांगता शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात झाली. मंगळवारपासून सुरू असलेल्या या पारंपरिक उत्सवात विद्यार्थिनींनी फेर धरत हस्त नक्षत्राच्या काळात गायली जाणारी भोंडल्याची पारंपरिक गाणी सादर करून संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.​कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता कामत आणि सौ. शामल बारदेसकर यांच्या हस्ते भोंडल्याच्या विधिवत पूजनाने झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, भोंडला हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून त्यातून निसर्गाशी नातं जोडणारे आणि जीवनाचे सार सांगणारे अनेक मोलाचे संदेश मिळतात. नव्या पिढीने आपली ही समृद्ध संस्कृती जोपासणे व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे.​यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचा विशेष सत्कारयाच कार्यक्रमाच्या औचित्याने विविध राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला:​समीक्षा पाटील: राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा मान्यवर श्री. घुमकर सर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.​वैभवी तेजम:​मथुरा (उत्तर प्रदेश) येथे ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक.​रयत शिक्षण संस्थेमार्फत आयोजित आंतरविभागीय रोप मल्लखांब स्पर्धेतही पटकावला प्रथम क्रमांक.या दुहेरी यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. हेमलता कामत यांच्या हस्ते करण्यात आला.​विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी समाधान व्यक्त करत सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. --- ## रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/rajhara-igalsha-sakal-aajara-yatha-haraka-mahatasavaca-bhavaya-va-thamakhathara-uthaghatana-sahali-sapanana - **Published**: 2026-10-08 15:52 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा: गोपाळ गडकरी,येथील नामांकित शैक्षणिक संस्था 'रोझरी इंग्लिश स्कूल'च्या हिरक महोत्सवी वर्षाचा (१९६७-२०२७) भव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. शाळेचा ऐतिहासिक रेव्ह. फादर जेकब कार्वाल्हो एस.जे. मेमोरियल स्टेज परिसर रोषणाईने उजळून निघाला होता.​समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिशप एमेरिटस अतिमहामहीम ऑलविन बॅरेटो उपस्थित होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग धर्मप्रांतातील रेव्हरंड फादर्स, सिस्टर्स, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.​कार्यक्रमाची सुरुवात सना तकीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कथक स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरक महोत्सवी वर्षाच्या अधिकृत ‘लोगो’चे अनावरण करण्यात आले.​बिशप ऑलविन बॅरेटो यांनी आशिर्वचन देताना शाळेच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले. ते म्हणाले, "रोझरी शाळेने दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर दणकट संस्कार केले आहेत. माजी विद्यार्थी, कार्यरत शिक्षक व पालकांच्या प्रेमातून ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील." फादर रिचर्ड सालदाना यांनी शाळेचा प्रगतीचा आलेख मांडला. तसेच 'आरसा' (AARSA) चे अध्यक्ष डॉ. रोझारियो डिसोझा आणि प्रकाश कार्व्हालो यांनी आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले विशेष नाटक "६० वर्षांचा कालप्रवास" विद्यार्थ्यांनी सादर केले. जेसिका कुटीन्हो व सौ. संयोगिता वाळके यांच्या दिग्दर्शनाखालील या नाटकाने प्रेक्षकांना १९६७ ते २०२६ या साठ वर्षांच्या आठवणींचा प्रवास घडवून आणला. स्टीफन फर्नांडिस व जीतन यांनी तयार केलेले जुन्या आठवणींचे संगीतमय सादरीकरण भावुक ठरले.​शाळा व्यवस्थापक फादर मेल्विन पायस व संयोजक श्री. स्टीफन डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक विजय केसरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर आशिष फर्नांडिस यांनी आगामी २०२७ च्या कॅलेंडरचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सांचेझ डिसोझा व सौ. शैलजा कांबळे यांनी केले, तर आभार संयोजक स्टीफन डिसोझा यांनी मानले. --- ## गोकुळ' निवडणुकीसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची उमेदवारी यादी जाहीर; दिग्गज नेत्यांना संधी - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/gakali-navadanaekasatha-mahayatacaya-chhatarapata-shaha-shatakara-vakasa-aaghadaca-umathavara-yatha-jahara-thagagaja-natayana-sathha - **Published**: 2026-10-08 09:42 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी कोल्हापूर:जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अनुभवी तसेच मातब्बर चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.​पक्षनिहाय जाहीर झालेले उमेदवार खालीलप्रमाणे:​राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)​श्री. राजेश नरसिंगराव पाटील (माजी आमदार) – चंदगड​श्री. अरुणराव गणपतराव डोंगळे – राधानगरी​श्री. राहुल पांडुरंग (पी. एन.) पाटील – करवीर​श्री. रणजित कृष्णराव (के. पी.) पाटील – भुदरगड​श्री. युवराज दत्ताजीराव पाटील – कागल​श्री. सतीश भीमगोंडा पाटील – गडहिंग्लज​श्री. नवीद हसनसाहेब मुश्रीफ – कागल​सौ. अर्चना आनंदराव (ए. वाय.) पाटील – राधानगरी​श्री. रणजीत दिलीप पाटील – शिरोळ​भारतीय जनता पार्टी (भाजप)​सौ. शौमिका अमल महाडिक – शिरोली​श्री. अंबरीशसिंह संजय घाटगे – कागल​श्री. चेतन अरुण नरके – पन्हाळा​श्री. दीपक भरमू पाटील – चंदगड​श्री. अशोक काशिनाथ चराटी – आजरा​श्री. प्रतापसिंह शंकरराव पाटील – करवीर​श्री. विश्वास शंकर जाधव – पन्हाळा​शिवसेना (शिंदे गट)​श्री. विश्वास नारायण पाटील (आबाजी) – करवीर​श्री. अजित शशिकांत नरके – पन्हाळा​श्री. संभाजी रंगराव पाटील – करवीर​श्री. अजित पांडुरंग पाटील – करवीर​ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक – कागल​श्री. मदन बाबुराव देसाई – भुदरगड​डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर – हातकणंगले​जन सुराज्य शक्ती पक्ष​श्री. कर्णसिंह संजयसिंह गायकवाड – शाहूवाडी​श्री. अमरसिंह यशवंत पाटील – पन्हाळा​जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना योग्य प्रतिनिधित्व देत महायुतीने तगडी फळी मैदानात उतरवली असून, उमेदवारांची नावे निश्चित झाल्याने गोकुळच्या रणधुमाळीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. --- ## नटसम्राट हरपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/natasamarata-harapal-jayashhatha-abhanata-nana-patakara-yaca-nathhana - **Published**: 2026-10-08 05:07 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा - प्रतिनिधी,मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने, धारदार संवादफेकीने आणि वास्तववादी भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर हे त्यांचे मूळ नाव. १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी अत्यंत संघर्षातून आपली कारकीर्द घडवली. चित्रपटांची पोस्टर्स रंगविण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘गमन’ या १९७८ मधील चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पोहोचला. ‘अंकुश’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’, ‘राजनीती’ यांसह ‘नटसम्राट’, ‘देऊळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘आपला माणूस’ अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. १९९१ मध्ये ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळविणाऱ्या नाना पाटेकर यांना २०१३ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. अभिनयासोबतच त्यांनी समाजसेवेतही मोठे योगदान दिले. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा हात दिला. नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रभावी आवाज कायमचा शांत झाला असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. --- ## तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा हायस्कूलचा डंका; १४ व १७ वर्षे वयोगटात मिळवले घवघवीत यश - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/talkasataraya-mathana-karada-saparathhata-aajara-hayasakalca-daka-va-varashha-vayagatata-malival-ghavaghavata-yasha - **Published**: 2026-10-08 03:23 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,येथे उत्साहात पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी चौफेर यश मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १४ वर्षे आणि १७ वर्षे अशा दोन्ही वयोगटांतील मुले व मुलींच्या विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली. या यशाच्या जोरावर अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.​स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेला निकाल खालीलप्रमाणे:​१७ वर्षे वयोगट निकाल:​१०० मीटर धावणे (मुले): महम्मद आय्याज यासीन माणगावकर (प्रथम क्रमांक)​२०० मीटर धावणे (मुले): अनंत संतोष गिरी (प्रथम क्रमांक)​मुलींचे वैयक्तिक यश: दीपा रामचंद्र गावडे हिने २०० मीटर धावणे, लांब उडी तसेच उंच उडी या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.​४×१०० मीटर रिले (मुले - प्रथम क्रमांक): महम्मद आय्याज माणगावकर, अनंत गिरी, सिद्धिक वाडीकर, जीवन कांबळे आणि प्रज्वल लाड.​४×१०० मीटर रिले (मुली - प्रथम क्रमांक): दीपा गावडे, साक्षी गावडे, श्रेया पाचवडेकर, श्रेया पाटील आणि श्रद्धा सलामवाडे.​४×४०० मीटर रिले: मुले व मुली अशा दोन्ही संघांनी चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक पटकावला.​१४ वर्षे वयोगट निकाल:​१०० मीटर धावणे: नियंत अजित पोवार (मुले - प्रथम क्रमांक), अन्वी राहुल नेवरेकर (मुली - प्रथम क्रमांक), उत्कर्ष उमेश जाधव (मुले - तृतीय क्रमांक).​२०० मीटर धावणे: उत्कर्षा अनिल निर्मळे (मुली - प्रथम क्रमांक), महंमद रहिमतुल्ला बुड्डेखान (मुले - द्वितीय क्रमांक).​थाळीफेक (मुले): उत्कर्ष उमेश जाधव (तृतीय क्रमांक).​४×१०० मीटर रिले (मुले - प्रथम क्रमांक): उत्कर्ष जाधव, महंमद रहिमतुल्ला बुड्डेखान, आरुष कुंभार, नियंत पोवार आणि ऋतुराज गिरीगोसावी.​४×१०० मीटर रिले (मुली - प्रथम क्रमांक): उत्कर्षा निर्मळे, मुंतहा सय्यद, श्रावणी इलगे, अन्वी नेवरेकर आणि अफिफा नेसरीकर.​या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे, सौ. एम. व्ही. पाटील व श्री. ए. एस. नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.​शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. अशोक अण्णा चराटी, संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. --- ## आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव यांची बिनविरोध निवड - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-sakhara-savaka-patasasathacaya-caaramanapatha-mahathava-saralikara-tara-vaha-caaramanapatha-sa-rajana-jathhava-yaca-bnavarathha-navada - **Published**: 2026-10-07 16:23 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी ​आजरा (प्रतिनिधी - गोपाळ गडकरी):आजरा साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, गवसे या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी महादेव विठोबा सरोळकर तर व्हाईस चेअरमनपदी सौ. रजनी रवींद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.​संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. येजरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा पार पडली. बैठकीत चेअरमन पदासाठी महादेव सरोळकर यांचे नाव संचालक प्रशांत जाधव यांनी सुचवले, तर त्यास संचालक पांडुरंग दोरुगडे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सौ. रजनी जाधव यांचे नाव संचालक विजय माने यांनी सुचवले आणि त्यास संचालक प्रभाकर कांबळे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.​या महत्त्वपूर्ण सभेस संचालक दयानंद लोहार, सागर मांगले, कृष्णाजी कांबळे, सौ. सुरेखा भुजंग यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक संदीप पाटकर व क्लार्क दशरथ मळेकर उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन महादेव सरोळकर व व्हाईस चेअरमन सौ. रजनी जाधव यांचे सर्व संचालक मंडळ, कारखाना कर्मचारी व सभासदांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. --- ## कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव पुरस्कार सोहळा उत्साहात - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/kalhapara-jalha-palsa-thal-aajara-palsa-thanae-ganaeshatasava-parasakara-sahali-utasahata - **Published**: 2026-10-07 15:57 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी - गोपाळ गडकरी):कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित सन २०२६ च्या गणेशोत्सवातील 'गणराया अवॉर्ड' स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत धामणे येथील फ्रेंडशिप मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गंगामाई वाचन मंदिरचे अध्यक्ष वामन सामंत यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले की, "गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सवही डॉल्बीमुक्त होतोय, ही कौतुकास्पद बाब आहे. आजरा पोलीस यंत्रणेने एकही सुट्टी न घेता चोख कर्तव्य बजावले. तहसील प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, महावितरणने अखंडित वीजपुरवठा, नगरपंचायतीने स्वच्छता आणि आरोग्य विभागाने शिबिरे राबवून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. तालुक्यातील गणेश मंडळांनीही डॉल्बीला फाटा देत शांततेत उत्सव साजरा करून प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले."​यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.​गणराया अवॉर्ड स्पर्धा निकाल:​प्रथम क्रमांक: फ्रेंडशिप मित्र मंडळ (धामणे)​द्वितीय क्रमांक: शिवसेना प्रणित जयशिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ​तृतीय क्रमांक: लिंगायत गल्ली मंडळ​उत्तेजनार्थ: अवधूत तरुण मंडळ (उत्तूर)​'एक गाव एक गणपती' स्पर्धा निकाल:​प्रथम क्रमांक: नवक्रांती मंडळ (सरोळी)​द्वितीय क्रमांक: हनुमान मंडळ (झुलपेवाडी)​तृतीय क्रमांक: राजा शिवाजी मंडळ (मलिग्रे)​उत्तेजनार्थ: न्यू जयशिवराय मंडळ (विटे)​या सोहळ्यात क्रेन मालकांचा तसेच डॉल्बीमुक्त उत्सवासाठी तालुक्यातील ६३ गावांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चोख कामगिरी बजावल्याबद्दल वामन सामंत, आरोग्य सेवक युनूस सैय्यद, अमित गुरव आणि ॲड. सचिन इंजल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.​शांततेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरात नवरात्रोत्सव साजरा करा: सपोनि बाबासाहेब सरवदेमार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले, "सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा शांततेत सण साजरा केला आहे. त्याच धर्तीवर आगामी नवरात्रोत्सवातही डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करावा. सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाळल्या पाहिजेत. प्रशासनाने दिलेल्या वेळेतच मिरवणुका पूर्ण कराव्यात, मंडपांत स्वयंसेवक व शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे."​नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.​या कार्यक्रमास पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश शेटे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता कृष्णा कोळी, पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्यासह वर्षा बागडी, अर्चना होलम, माधुरी पाचवडेकर, नगरसेवक अनिकेत चराटी, महावितरणचे संतोष डोंगरे, नगरपंचायतीचे प्रदीप नाईक, अबूसईद माणगावकर, शरीफ खेडेकर, महेश पाटील, आनंदा फडके, इस्माईल सोनेखान, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-mahavathayalyata-naka-rafarama-vashhayavara-karayashali-sapanana - **Published**: 2026-10-07 02:28 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा: प्रतिनिधी,येथील आजरा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ या विषयावर नुकतीच एकदिवसीय विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. नॅक मूल्यांकनाची नवीन सुधारित कार्यपद्धती, गुणवत्ता निकष आणि मानांकन प्रक्रियेतील बदलांविषयी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.​कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूरचे नॅक समन्वयक प्रा. डॉ. निलेश पवार उपस्थित होते. त्यांनी नॅक रीफॉर्म- २०२४ अंतर्गत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकत सुधारित दहा विभाग, नवीन गुणदान पद्धती, आवश्यक कागदपत्रे, अचूक डेटा संकलन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी उपयोग आणि सादरीकरणाच्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. "नॅक मानांकन ही केवळ गुणांकनाची प्रक्रिया नसून महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्ता सातत्याने उंचावण्याची संधी आहे," असे नमूद करत त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमाचा अहवाल व व्हिडिओ अधिकृत संकेतस्थळावर वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केले. उपस्थित प्राध्यापकांनी विविध प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. के. जी. पोतदार म्हणाले, "नॅकच्या नवीन कार्यपद्धतीनुसार प्राध्यापकांनी आतापासूनच पद्धतशीर तयारी सुरू करावी. या कार्यशाळेमुळे मिळालेल्या मार्गदर्शनाचा आगामी नॅक प्रक्रियेत महाविद्यालयाला नक्कीच मोठा फायदा होईल."​कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एस. कर्पे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बी. एम. मोहिते यांनी करून दिला. प्रा. डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी तांत्रिक साहाय्य प्रा. एस. के. जाधव व डॉ. एस. पी. गजरे यांनी केले.​या कार्यशाळेस कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, समन्वयक प्रा. एस. बी. सावंत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) विभागाचे कौतुक होत आहे. --- ## भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/bhajapa-kalhapara-garamanae-sashal-madaya-salcaya-saha-sayajakapatha-harashhatha-paralikara-aajara-yaca-navada - **Published**: 2026-10-07 02:17 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा: गोपाळ गडकरी,भारतीय जनता पार्टी कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हा सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी आजरा येथील निष्ठावंत कार्यकर्ते श्री. हर्षद परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परुळेकर यांचा आजवरच्या संघटनेच्या कामाचा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल आजरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हर्षद परुळेकर म्हणाले की, "माझ्या प्रामाणिक कष्टांना पक्षाने दिलेली ही पावती असून, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला हा मोठा विश्वास आहे. ही केवळ एक पदोन्नती नसून पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."​या नियुक्तीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हा भाजपचे खंबीर अध्यक्ष नाथाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.​तसेच, विश्वासाने ही जबाबदारी दिल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ), आयुष्मान भारत समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, आजरा शहराचे माजी सरपंच अरुण देसाई, ज्येष्ठ मार्गदर्शक मलिक कुमार बुरुड, प्रा. सुधीर मुंज, श्रीनाथ देसाई, आनंदा कुंभार, दयानंद भुसारी यांच्यासह पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.​हर्षद परुळेकर यांच्या नियुक्तीमुळे आजरा परिसर आणि कोल्हापूर ग्रामीण भागातील भाजप सोशल मीडिया सेल अधिक सक्रिय व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. --- ## वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती; व्यंकटराव हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/vanayajava-sapatahanamatata-aajara-yatha-sapavashhaya-janajagata-vayakatarava-hayasakalmathhaya-maragatharashana-shabra-sapanana - **Published**: 2026-10-06 06:29 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,वन्यजीव सप्ताह २०२६ च्या निमित्ताने वनविभाग आजरा यांच्या वतीने स्थानिक व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वन्यजीव व सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, सापांविषयीचे गैरसमज दूर करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.​सदर कार्यक्रमाचे आयोजन आजरा परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील होते.​कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक व निसर्ग मार्गदर्शक विकास माने यांनी “साप, सापांच्या प्रजाती, समज व गैरसमज” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सापांच्या विविध प्रजातींची ओळख, समाजातील गैरसमज आणि परिसरात साप आढळल्यास कोणती काळजी घ्यावी, याचे सविस्तर विश्लेषण केले. कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक विजय पाटील यांनी “मानव व वन्यजीव संघर्ष” या विषयावर बोलताना संघर्षाची मूळ कारणे, सुरक्षिततेचे उपाय आणि संवर्धनात सर्वसामान्य नागरिकांचे योगदान यावर प्रकाश टाकला.​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उत्तर आजरा परिमंडळ वन अधिकारी कृष्णा डेळेकर यांनी केले. त्यांनी वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची आजच्या काळातील गरज विषद केली.​याप्रसंगी परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वनरक्षक प्रियांका पाटील, संगीता राठोड, सरिता बावस्कर, वनसेवक कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, सुरेश पताडे यांच्यासह वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य राहुल गवळी, समीर केरकर, साहिल डेळेकर, विनायक पताडे, अक्षय पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पारळे यांनी केले, तर प्रा. महादेव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. --- ## आजरा हायस्कूलमध्ये काशिनाथ आण्णा स्मृती दिन संपन्न; अक्षरा पाटीलचे उल्लेखनीय यश. - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-hayasakalmathhaya-kashanatha-aanaenae-samata-thana-sapanana-akashhara-patalca-ullkhanaya-yasha - **Published**: 2026-10-06 02:01 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा, प्रतिनिधी : गोपाळ गडकरी,                                                       जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ आण्णा यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. यावेळी व्ही. पी. हरेर मॅडम यांनी काशिनाथ आण्णा यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा व विचारांचा परिचय करून दिला. दरम्यान, आजरा महाविद्यालयात आयोजित अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धांमध्ये आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेत अक्षरा सर्जेराव पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांचे प्रोत्साहन तसेच स्पर्धा विभागाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. शेलार मॅडम यांनी केले, तर एस. एस. कुराडे मॅडम यांनी आभार मानले. --- ## आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न* - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-mahavathayalyata-anaenae-bhauu-samata-pathharavadayanamatata-talkasataraya-shalya-vakatatava-va-nabthha-saparathhaca-uthaghatana-va-paratashhaka-vataranae-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-05 12:48 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरी आजरा महाविद्यालय, आजरा च्या वतीने 'अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्या'अंतर्गत शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे उद्घाटन तसेच पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अशोक अण्णा चराटी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे संचालक माननीय के. व्ही. येसणे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील व कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते. सकाळी सोहळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर दोन्ही स्पर्धा पार पडल्या. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या वक्तृत्व व लेखन कौशल्याचा परिचय दिला. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन संयोजिका प्रा. व्ही. एम. देसाई यांच्यासह संयोजन समिती सदस्य प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. व्ही. डी. हाक्के आणि प्रा. बी. व्ही. गावडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी खालीलप्रमाणे: *वक्तृत्व स्पर्धा*: * प्रथम क्रमांक: समृद्धी उत्तम वांद्रे (पेरणोली हायस्कूल, पेरणोली) * द्वितीय क्रमांक: संस्कृती रवींद्र गुरव (व्यंकटराव हायस्कूल, आजरा) * तृतीय क्रमांक: अश्विता दत्तात्रय शिमणे (भादवण हायस्कूल, भादवण) * उत्तेजनार्थ १: आर्या अजित येसादे (माध्यमिक विद्यालय, अर्दाळ) * उत्तेजनार्थ २: कस्तुरी शिवाजी भगुत्रे (मलिग्रे हायस्कूल, मलिग्रे) *निबंध स्पर्धा*: * प्रथम क्रमांक: अक्षरा सर्जेराव पाटील (आजरा हायस्कूल, आजरा) * द्वितीय क्रमांक: प्रियांका युवराज सुतार (मडिलगे हायस्कूल, मडिलगे) * तृतीय क्रमांक: स्वराली रमेश वांद्रे (माध्यमिक विद्यालय, अर्दाळ) * उत्तेजनार्थ १: अनवया रणजीत देसाई (व्यंकटराव हायस्कूल, आजरा) * उत्तेजनार्थ २: श्रुती तुकाराम बापट (वाटंगी हायस्कूल, वाटंगी) स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक वृंदांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. --- ## आजरा महाविद्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांना पोलीस भरती व दक्षता पथकाबाबत मार्गदर्शन - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-mahavathayalyacaya-vatana-palsa-thanaeyata-savacachhata-mahama-vathayarathayana-palsa-bharata-va-thakashhata-pathakabbta-maragatharashana - **Published**: 2026-10-04 10:10 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा: गोपाळ गडकरी,आजरा महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आजरा पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील ५५ विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. श्रमदानातून विद्यार्थ्यांनी संपूर्ण पोलीस ठाणे परिसर स्वच्छ केला.​स्वच्छता मोहिमेनंतर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना चहा-नाश्ता देण्यात आला. यानंतर आयोजित संवाद सत्रात पोलीस अधिकारी बाबासाहेब सरवदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील शिस्त, कायद्याचे पालन आणि समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणाईचे योगदान याविषयी त्यांनी मोलाचे विचार मांडले.​याप्रसंगी हर्षाली मॅडम यांनी दक्षता पथकाचे कामकाज, नागरिकांची सुरक्षा आणि महिला सुरक्षेशी संबंधित कायद्यांची माहिती दिली. कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता पथक कसे काम करते, हे त्यांनी स्पष्ट केले. तर राहुल पन्हाळकर यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शारीरिक व लेखी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.​महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले असून, या संवादामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची जवळून माहिती मिळाली. --- ## ब्रेकिंग न्यूज: गणेशोत्सवापाठोपाठ आजरा शहरातील नवरात्रोत्सवही होणार डॉल्बीमुक्त! - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/brakaga-nayaja-ganaeshatasavapathapatha-aajara-shaharatal-navarataratasavaha-hanaera-dalbmakata - **Published**: 2026-10-03 15:59 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी):शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याची परंपरा जपत आजरा शहराने पुन्हा एकदा पुरोगामी पाऊल उचलले आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा नवरात्रोत्सवही डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा एकमुखी निर्णय शहरातील प्रमुख मंडळांनी घेतला आहे. यासंदर्भात शहरातील सहा प्रमुख दुर्गामाता उत्सव मंडळांनी आजरा पोलीस ठाण्यात अधिकृत पत्र सादर केले आहे.​मंडळांचा पर्यावरणपूरक व शांतताप्रिय निर्णयनवरात्रोत्सवातील दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी अथवा मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांचा (डीजे) वापर केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तीमय वातावरणात हा उत्सव साजरा केला जाईल, असे मंडळांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.​पोलीस प्रशासनाकडून निर्णयाचे स्वागतशहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण विषयक नियमांचे पालन करण्यासाठी मंडळांनी स्वतःहून घेतलेल्या या निर्णयाचे आजरा पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले आहे. इतर मंडळांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.​पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहात, मात्र कोणत्याही ध्वनिप्रदूषणाविना उत्सव साजरा करण्याच्या या निर्णयाचे आजरेकरांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. --- ## आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aatharasha-hayasakal-sharasaga-yatha-vana-janiana-saparathha-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-03 08:20 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी शिरसंगी (ता. आजरा):येथील आदर्श हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभाग चंदगड यांच्या वतीने वनविषयक माहितीवर आधारित 'वन ज्ञान स्पर्धा' उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना वन, वन्यजीव व पर्यावरण यांविषयी सामान्य ज्ञान मिळावे तसेच भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी, या हेतूने वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे, या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणानुक्रम काढण्याचे काम खुद्द विद्यार्थ्यांनीच केले.​स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:​प्रथम: साईराज विष्णू देसाई​द्वितीय: विशाल विजय वांजोळे​तृतीय: संभव चाळु चौगले​चतुर्थ: अथर्व आनंदा कांबळे​पाचवी: वैदवी तुकाराम बुरुड​सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वही आणि पेन देऊन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.​याप्रसंगी वनक्षेत्रपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग, संस्कृती आणि विद्यार्थ्यांची पर्यावरणाप्रती जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. वन विभागातील रंजक अनुभव सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजनही केले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल क्रीडा शिक्षक आनंद प्रभू यांचा वनक्षेत्रपाल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक मदन देसाई यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक विठ्ठल चौगले यांनी केले, तर सहायक शिक्षिका मेघा जाधव यांनी आभार मानले.​या उपक्रमास वन विभागाचे कर्मचारी, प्रशालेचे कर्मचारी दिलीप देसाई तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. --- ## श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आजरा शाखा व्यवस्थापकांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय मदत मंजूर - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/shara-brashavara-ka-oipa-karadata-sasayatacaya-aajara-shakha-vayavasathapakacaya-patanacaya-shasatarakarayasatha-vathayakaya-mathata-majara - **Published**: 2026-10-02 15:00 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा / प्रतिनिधी: गोपाळ गडकरी,सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी कल्याणासाठी अग्रेसर असलेल्या जोल्ले ग्रुप संचलित 'श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एक्संबा (मल्टी-स्टेट)'च्या आजरा शाखेचे व्यवस्थापक श्री. दत्तात्रय सुतार यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयाकडून वैद्यकीय मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीच्या मंजुरीचे अधिकृत पत्र शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते श्री. सुतार यांना सुपूर्द करण्यात आले.​यासंदर्भात माहिती देताना शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांनी सांगितले की, "संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात नेहमी पाठीशी उभे राहण्याची जोल्ले ग्रुपची परंपरा आहे. या शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी जोल्ले ग्रुपचे संस्थापक, माजी खासदार तथा बेळगावी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब जोल्ले आणि सहसंस्थापिका, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी तत्परतेने विशेष सहकार्य केले."​या पत्र वितरणप्रसंगी सोसायटीचे संचालक सुरेश मिटके, महेश कुरुणकर, सुशांत निकम, तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे तसेच विठोबा मंदिर नबापूरचे ट्रस्टी समीर मोरजकर यांच्यासह इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. संकटसमयी संस्थेकडून मिळालेल्या या आर्थिक पाठबळाबद्दल शाखा व्यवस्थापक सुतार यांनी जोल्ले कुटुंबीय व संचालक मंडळाचे आभार मानले. --- ## वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी; संचालक गोविंद पाटील यांच्या हस्ते अभिवादन - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/vasatarava-thasaii-aajara-sakhara-karakhanayata-mahatama-gathha-jayata-utasahata-sajara-sacalka-gavatha-patal-yacaya-hasata-abhavathana - **Published**: 2026-10-02 14:36 - **Category**: अर्थव्यवस्था - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा / प्रतिनिधी:येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.​यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कारखान्याचे संचालक मा. श्री. गोविंद पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन केले.​याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत, डेप्युटी चीफ अकौंटंट रमेश वांगणेकर, जक्रीया तकीलदार यांच्यासह कारखान्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व अन्य स्टाफ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व 'डिजिटल अरेस्ट'बाबत जनजागृती; पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा मराठा महासंघातर्फे सत्कार - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/jayashhatha-nagarakaca-sarakashha-va-dajatal-arasatabbta-janajagata-palsa-narakashhaka-bbsahab-saravatha-yaca-maratha-mahasaghatarafa-satakara - **Published**: 2026-10-02 14:23 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी विशेष प्रतिनिधी: गोपाळ गडकरीसमाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना आळा घालणे, ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची काळजी घेणे आणि सध्या मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या मोबाईल अरेस्ट (डिजिटल अरेस्ट), सायबर फसवणूक व आर्थिक लुटीबाबत सजगता निर्माण करणे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.​या कार्यक्रमाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हा सत्कार महासंघाचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.​याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस प्रशासनाने सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या क्लृप्त्या उघड केल्या. "डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना भीती दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते. अशा कोणत्याही संशयास्पद कॉल्स अथवा धमक्यांना ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात घाबरू नये, तातडीने कुटुंबीय आणि पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गावातील व परिसरातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा सूर मान्यवरांनी लावून धरला.​या सोहळ्यास मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, उपजिल्हाध्यक्ष सी. आर. देसाई, आजरा तालुकाध्यक्ष शंकरराव शिंदे, कार्याध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव संभाजीराव इंजल यांच्यासह प्रकाशराव देसाई, पावले सर, सी. डी. देसाई, राजू सावंत, सूर्यकांत आजगेकर, भाऊ निर्मळे, दत्ताजीराव मोहिते, महादेव पवार, शिवाजीराव इंजल आणि महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aatharasha-hayasakal-sarasagamathhaya-mahatama-gathha-va-ll-bhathara-shasatara-jayata-utasahata-savacachhatavashhayaka-pathanatayal-garamasathaca-utasafarata-paratasatha - **Published**: 2026-10-02 13:46 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी सिरसंगी (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,स्थानिक आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.​कार्यक्रमाचा प्रारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक मदन देसाई यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक देसाई यांनी महात्मा गांधीजींचे जीवनकार्य, सत्याग्रहाची मूल्ये आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या साध्या राहणीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी इयत्ता आठवीचा विद्यार्थी आदित्य अशोक कुंभार याने महात्मा गांधींची हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.​जयंतीचे औचित्य साधून गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. प्रभातफेरीदरम्यान गावातील मुख्य बसस्थानकावर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला सौ. मेघा चव्हाण व कु. श्रुती वांजोळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या सादरीकरणाचे उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून कौतुक केले.​या सोहळ्यास विठ्ठल चौगुले, आनंदा प्रभू, दिलीप देसाई, संतराम केसरकर, पोलीस पाटील दत्तात्रय गुरव, उपसरपंच पांडुरंग टकेकर, एकनाथ मातवणकर, अनिल परीट, गणू कसेकर, सुरेश येलगार, पांडुरंग होडगे यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## वन्यजीव सप्ताहानिमित्त तुर्केवाडी आयटीआयमध्ये निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/vanayajava-sapatahanamatata-tarakavada-aayataaayamathhaya-nabthha-saparathha-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-02 13:31 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी चंदगड / प्रतिनिधी: गोपाळ गडकरी,सामाजिक वनीकरण विभाग चंदगड यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ च्या पहिल्या दिवशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तुर्केवाडी (स्थित हलकर्णी) येथे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.​कार्यक्रमादरम्यान पहिल्या तीन क्रमांकांच्या यशस्वी विजेत्यांना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी ‘निसर्ग व मानवी जीवन’ या विषयावर सखोल विचार मांडले. मानवाचे अस्तित्व निसर्गावरच अवलंबून असून वन्यजीव व पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे, असा संदेश त्यांनी दिला.​या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल माणिक खोत, वनरक्षक अरुण सांगळे, जालिंदर गावडे आणि वनसेवक रवी पाटील यांच्यासह आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते --- ## सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/saparathaya-bharata-shara-kashhanaekata-savama-yaca-amata-mahatasava-vadhathavasa-utasahata-sharakashhatara-shalipa-yatha-sapanana-jhal-satakara-sahali - **Published**: 2026-10-02 13:21 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी विशेष प्रतिनिधी / शेळप: गोपाळ गडकरी,अखिल भारतीय पद्मनाभाचार्य शिष्य सांप्रदायाचे ज्येष्ठ भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस दत्त मंदिर, श्रीक्षेत्र शेळप येथे अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.​गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ सांप्रदायाच्या सेवेत पूर्ण समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या कृष्णकांत स्वामींनी गुरुपरंपरा, भक्ती आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करत समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. परमपूज्य गुरुवर्य चंद्रानन स्वामी यांच्या सहवासातून लाभलेला मार्गदर्शनाचा समृद्ध वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. शेळप येथील पवित्र दत्त मंदिराच्या उभारणीपासून ते सर्वांगीण विकासापर्यंत त्यांचे मोलाचे योगदान राहिले असून, मंदिराच्या विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले आहे. तसेच सांप्रदायात अनेक गुरुबंधूंना दीक्षा देऊन त्यांनी ही आध्यात्मिक परंपरा अधिक समृद्ध केली.​व्यावसायिक जीवनात मुंबईतील प्रसिद्ध जी. टी. हॉस्पिटलमध्ये सलग ४० वर्षे शासकीय सेवा बजावत त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा संदेश जनमानसात रुजवला. यासोबतच मृदंग व पखवाज वादनातही त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. एक दानशूर, अत्यंत प्रेमळ आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत मोठी ख्याती आहे.​या अमृत महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या हस्ते स्वामींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित सुहासिनींनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण व आरती केली.​या सोहळ्यास श्री दत्त मंदिराचे विश्वस्त, पंचक्रोशीतील गुरुबंधू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कृष्णकांत स्वामींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून अशीच अविरत समाज व ईश्वरसेवा घडावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. --- ## आजरा हायस्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छता अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-hayasakalmathhaya-gathha-shasatara-jayata-utasahata-savacachhata-abhayanatana-thal-savacachhataca-sathasha - **Published**: 2026-10-02 08:37 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (प्रतिनिधी) : गोपाळ गडकरी,येथील आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेच्या वतीने आजरा शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेची शिकवण तसेच शास्त्रीजींचा साधेपणा, निस्वार्थ देशभक्ती व कर्तव्यनिष्ठा या मूल्यांची माहिती देण्यात आली.​यावेळी शिक्षिका भाग्यश्री पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनप्रवासावर व विचारांवर सविस्तर प्रकाश टाकला, तर संजीवनी कुराडे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेतील योगदानावर विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार माधवी शेलार यांनी मानले.​जयंतीच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता अभियानात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आजरा परिसरातील प्रमुख ठिकाणांची सफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला. "स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती किंवा अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन आचरणाचा भाग बनली पाहिजे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली. --- ## व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/vayakatarava-shakashhanae-sakalta-mahatama-gathha-va-llbhathara-shasatara-jayata-utasahata-sajara - **Published**: 2026-10-02 07:13 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा :येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री. जयवंतरावजी शिंपी यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.​याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. जयवंतराव शिंपी म्हणाले की, "तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आजच्या जगाला खऱ्या अर्थाने गांधी विचारांची गरज आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा स्वीकार संपूर्ण जगाने करणे ही आपल्या भारताची फार मोठी पोचपावती आहे." तसेच 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मतही त्यांनी मांडले.​पंचायत समिती शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी 'नशामुक्ती' या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. या पथनाट्यासाठी श्री. एस. एस. कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता नववी 'ड' चे विद्यार्थी आणि मार्गदर्शिका सौ. ए. एस. गुरव यांच्या वतीने करण्यात आले होते.​या कार्यक्रमास आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी. पटेकर, खजिनदार सुनील पाटील, संचालक सुधीर जाधव, सचिन (भैय्या) शिंपी, अशोक पोवार, प्रभारी प्राचार्य चंद्रकांत पन्हाळकर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार पाटील, पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. एन. ए. मोरे, सौ. एस. डी. इलगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. होरटे यांनी केले --- ## श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/sharamata-gagamaii-vacana-matharaca-va-varashhaka-sabha-utasahata-sapanana - **Published**: 2026-10-02 06:35 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी विशेष प्रतिनिधीशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील ऐतिहासिक श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ४.५० कोटी रुपयांच्या निधीतून ग्रंथालयाची भव्य वास्तू शहराच्या मध्यवर्ती भागात उभारत असून, सुसज्ज अभ्यासिकेसह या नवीन इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार संस्थेचे अध्यक्ष डॉ. वामन सामंत यांनी व्यक्त केला.​सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सामंत यांनी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. तसेच ग्रंथालयाने १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देण्याची अभिनव योजना सुरू केली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.​याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले अभ्यासक रोहित शेवाळे (पोळगाव), मनोज नार्वेकर (पोळगाव), अतिश बागवे (बुरूडे), संध्या पाटील (होनेवाडी), स्नेहल पाटील (मुरूडे), साहिल तेजम (विटे), प्राजक्ता कांबळे (बुरूडे), सुहास कोंडुसकर (सोहाळे), तानाजी कांबळे (देवर्डे), शुभांगी चौगुले (मेंढोली) आणि रेश्मा शिंदे (वेळवट्टी) यांचा शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन विशेष गौरव करण्यात आला.​ग्रंथालयाचे संचालक व माजी सहकार्यवाह विनायक मल्लाप्पा आमणगी यांनी स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून ग्रंथालयाच्या जागेत बोअरवेल व मोटरपंप जोडणीसाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल सभेमध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.​सत्कारानंतर विनायक आमणगी, टीईटी परीक्षेतून शिक्षकपदी निवड झालेल्या रेश्मा शिंदे आणि संचालक सुभाष विभुते यांनी मनोगत व्यक्त केले.​सभेच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यकारिणी सदस्या सुचेता गड्डी यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी विषयपत्रिका, मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक पत्रकांचे वाचन केले; त्यास सभेने एकमुखाने मंजुरी दिली.​या सभेस लेखापरीक्षक प्रकाशराव देसाई, मारुतीराव मोरे, अनंत आजरेकर, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव इंजल, आप्पा पावले, आय. के. गिलबले, शितल हरेर, शुभांगी निर्मळे, सुरेखा भालेराव, नुरजहाँ सोलापूरे, सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, डॉ. अशोक बाचुळकर, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक संभाजीराव इंजल यांनी केले, तर उपाध्यक्षा विद्या हरेर यांनी उपस्थितांचे आभार मानले. --- ## अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/anaenaebhauu-samata-pathharavada-va-mahatama-gathha-jayatanamatata-aajara-shakashhanaeka-sakalta-bhavaya-savacachhata-abhayana - **Published**: 2026-10-02 04:28 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा (विशेष प्रतिनिधी)- गोपाळ गडकरी,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती पंधरवडा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.​जनता शिक्षण संस्था संचलित आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, अण्णाभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.​अभियानाची सुरुवात जनता शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रमेशअण्णा कुरुणकर व संचालक श्री. अनिकेतदादा चराटी यांच्या हस्ते स्वच्छता अवजारांचे पूजन करून झाली. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे एनएसएस (NSS) प्रकल्प अधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. "स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन आचरणाचा भाग बनली पाहिजे," असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.​या मोहिमेअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजरा महाविद्यालय परिसर, आजरा पोलीस ठाणे, एस.टी. डेपो व बस स्थानक, पंचायत समिती परिसर, मोरस्कर महाराज समाधी व घाट परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची सखोल स्वच्छता केली. कचरा संकलन व वर्गीकरण करून सार्वजनिक ठिकाणे चकाचक करण्यात आली. गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.​या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, अधीक्षक श्री. योगेश पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.​आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत या स्तुत्य उपक्रमाचे संयोजन करण्यात आले. शेवटी वरिष्ठ विभागाचे एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेमुळे या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. --- ## रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/rajhara-vathayalyata-mahatama-gathha-va-ll-bhathara-shasatara-jayata-utasahata-sajara - **Published**: 2026-10-02 04:13 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा -प्रतिनिधी,स्थानिक रोझरी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनवेल बार्देसकर, पर्यवेक्षक श्री. विजय केसरकर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. डॉमिनिक डिसोझा यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या दोन्ही थोर महापुरुषांना मनोभावे अभिवादन केले.​कार्यक्रमात इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सायमा दरवाजकर हिने आपल्या मनोगतातून महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरक जीवनपटाचा परिचय उपस्थितांना करून दिला. शिक्षक श्री. स्टीफन डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "या दोन्ही महापुरुषांच्या महान विचारांचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करणे आवश्यक आहे. त्यांच्या सत्य, अहिंसा, साधेपणा आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचे जीवनात आचरण करणे हेच त्यांना खरेखुरे अभिवादन ठरेल."​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संयोजिका सौ. प्रणिता होडगे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिसादात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. --- ## दि न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान उत्साहात - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/tha-naya-igalsha-sakalmathhaya-gathha-jayatanamatata-savacachhata-abhayana-utasahata - **Published**: 2026-10-01 15:31 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी चंदगड : प्रतिनिधीराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील ‘दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज’मध्ये स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळा व महाविद्यालय परिसरात सर्वसमावेशक स्वच्छता मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी परिसराचा कायापालट केला.​मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हातात झाडू, फावडे, घमेली व कुदळ घेऊन संपूर्ण आवार स्वच्छ केले. परिसरातील प्लास्टिक कचरा, वाळलेला पालापाचोळा आणि अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावून परिसर चकाचक करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.​याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य आर. पी. पाटील म्हणाले, "स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित मोहीम नसून, ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे." तर उपप्राचार्य टी. एस. चांदेकर यांनी 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' या संकल्पनेवर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांनी स्वतःपासून सुरुवात करून समाजातही स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले.​या उपक्रमाचे नेटके नियोजन क्रीडा शिक्षक टी. व्ही. खंदाळे, एस. जी. साबळे व युवराज भवारी यांनी केले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे या अभियानाला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले. अखेर "स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि सुंदर भारत" हा कृतिशील संदेश देत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांना श्रमदानातून आदरांजली वाहिली. --- ## तीन वर्षांत एकता गृहतारण संस्थेच्या ठेवी ४ कोटी ५२ लाखांवर आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी; लवकरच शाखाविस्तार : संस्थापक संतोष जाधव - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/tana-varashhata-ekata-gahataranae-sasathacaya-thava-kata-lkhavara-aajara-talkayatal-garamanae-bhagata-ullkhanaya-kamagara-lvakaraca-shakhavasatara-sasathapaka-satashha-jathhava - **Published**: 2026-10-01 15:08 - **Category**: अर्थव्यवस्था - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी पेरणोली : प्रतिनिधी - गोपाळ गडकरीग्रामीण भागातील जनतेला भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या., पेरणोलीने अवघ्या तीन वर्षांत ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवींचा पल्ला गाठत उल्लेखनीय यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पावधीत अशी भरीव कामगिरी करणारी ही पहिलीच संस्था ठरली असून, वाढत्या आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर लवकरच संस्थेचा शाखाविस्तार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक संतोष जाधव यांनी दिली.​येथील रवळनाथ मंदिरात संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. संचालक अविनाश जोशिलकर यांनी दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला.​संस्थेचे चेअरमन पंकज देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविकातून आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, "संस्थेकडे सध्या ४ कोटी ५२ लाख रुपयांच्या ठेवी जमा असून ३ कोटी २९ लाख रुपयांचे कर्जवाटप आणि १ कोटी ३२ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक आहे. संस्थेचा राखीव निधी व वसूल भागभांडवल २० लाख रुपये असून संस्थेने २ लाख २८ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. पहिल्या वर्षापासून सभासदांना सातत्याने ८ टक्के लाभांश देण्यात येत आहे." सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावरच ही प्रगती शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.​संस्थापक संतोष जाधव यांनी ताळेबंद व आर्थिक पत्रकांची माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, गतिमान आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी नवीन शाखा सुरू करून कार्यविस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.​याप्रसंगी संस्थेचे संचालक सुनील चव्हाण सर यांना 'आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' मिळाल्याबद्दल संस्थेचे सल्लागार शिवाजी मस्कर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत यश मिळवलेले सभासद आणि इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी संचालक सुनील चव्हाण, सभासद शिवाजी बिद्रे व पत्रकार रणजीत कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.​मॅनेजर राजेंद्र कळेकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला, त्यास सभागृहाने एकमुखाने मंजुरी दिली. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा होऊन आवश्यक ते ठराव मंजूर करण्यात आले.​या सभेस संस्थेचे व्हा. चेअरमन अनिल पारदे, संचालक शेखर कळेकर, कृष्णा सासुलकर, रणजीत फगरे, युवराज कांबळे, संजय गुरव, प्राजक्ता फगरे, सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## पंडित दीनदयाळ विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' उत्साहात साजरा - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/padata-thanathayali-vathayalyata-aatararashhataraya-jayashhatha-nagaraka-thana-utasahata-sajara - **Published**: 2026-10-01 13:12 - **Category**: शैक्षणिक - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी विशेष प्रतिनिधी - गोपाळ गडकरी,येथील पंडित दीनदयाळ विद्यालयात १ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील व कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या अमूल्य योगदानाचा गौरव करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे विद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "धावत्या युगात ज्येष्ठांकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्रेमाचे दोन शब्द, थोडा वेळ आणि आपली सोबत देणे अत्यंत गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे."​शिक्षक पी. जी. प्रभू यांनी, "आजी-आजोबा म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ असून ते कुटुंबाचे व समाजाचे अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करणे ही केवळ जबाबदारी नसून आपली सुंदर संस्कृती आहे," असे विचार मांडले. तर शिक्षक ए. एन. पाटील यांनी आजी-आजोबा हेच आपले पहिले गुरू असून त्यांच्या गोष्टी आणि अनुभव हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी असल्याचे सांगितले.​कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक शिवाजी बिरजे गुरुजी यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विभक्त कुटुंबपद्धतीवर प्रकाश टाकला. लहान झालेल्या कुटुंबांमध्येही ज्येष्ठांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दुसरे ज्येष्ठ नागरिक आक्रम नेसरीकर यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक बनावे, अशी प्रेरणा दिली.​या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन एस. ए. निर्मळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. पी. कांबळे यांनी मानले. --- ## आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-sakhara-karakhanayaca-36-va-varashhaka-saravasathharanae-sabha-sapanana - **Published**: 2026-10-01 12:21 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा प्रतिनिधी - गोपाळ गडकरी, वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. उपाध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले. संचालक रणजित देसाई यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक संभाजी पाटील यांनी नोटीस वाचन केले. तर अधीक्षक अनिल देसाई यांनी मागील सभेचे इतिवृत्तांत वाचले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले.       प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन मुकुंद देसाई म्हणाले की, कारखाना अडचणीत असताना कामगारांनी मोठे योगदान दिले आहे. 50 टक्के पगारावर काम करून संस्था टिकवायचे काम केले आहे. कामगारांप्रमाणेच सभासदांनीही त्याग दिल्यामुळे बंद असलेले कारखान्याचे चाक सुरु झाले. एन. सी. डी. सी. चे कर्ज मिळवून द्यायला कै. अजितदादा पवार आणि नाम. हसन मुश्रीफ यांचे योगदान मोठे आहे. 122कोटीचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्यामुळे भविष्यात चांगल्या प्रकारे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. कारखान्याला दरमहा 88 लाख व्याज भरावे लागते ते वेळेत आणि मुदतीत भरले जात आहे. अहवाल सालात 2 कोटीहुन अधिकची बचत केली आहे. साखरेचे दर वाढले तरी याचा लाभ कारखान्यांना मिळालेला नाही. आता पुन्हा साखरेचे दर कमी झाले आहेत.साखरेचे दर वाढले तेव्हा कोटा मिळाला नाही त्यामुळे कारखान्याला साखर दर वाढीचा फायदा झाला नाही. कामगारांना पुढच्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने 100 टक्के पगार करणार आहे. बोनस देता येत नव्हते तरीसुद्धा दिवाळीला 8•33 बोनस देण्यात येणार आहे. जुनी मशनरी असल्याने त्यात आता काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याने नवीन बदल करण्याचे धोरण सुरु आहे. कर्मचारी, सभासद यांच्याबरोबरच संचालकांचीही साथ मोलाची ठरली आहे. ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करणेत आले आहे. त्याचप्रमाणे शेतीविभागाने ऊसतोडणीचे 7 ते 8 मशीन उपलब्ध केल्या आहेत. गाळप हंगाम 2026/27 मध्ये 4 लाखाहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाच गटातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांचा यावेळी रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजकारण बाजूला ठेऊन तालुक्याचे वैभव टिकवायचे आहे ही भावना मनात ठेऊन कारखान्याला सहकार्य करा. पाच वर्षे ऊसविकांसाकडे दुर्लक्ष झाले. आता विविध तांत्रिक योजना राबवून ए. आय. च्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग उत्तूर सेंटरला व्ही. एस. आय. पुणे यांच्या माध्यमातून सुरु आहे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केला आहे. याअगोदर एफ. आर. पी. पेक्षा जास्त 3400₹ ऊस दर दिला आहे. तरीसुद्धा आता पुन्हा 100₹ चा अधिकचा हफ्ता दिवाळीला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी या दिवाळीपूर्वी देण्यात येतील व कर्मऱ्यांची थकीत देणी टप्प्याटप्प्याने दिले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.  माजी चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की,ओव्हरहोलिंगसाठी जादा खर्च करूनही गाळप कमी होत असल्याचे निदर्शनास आणले. गाळप कमी झाले तर कारखान्याला फटका बसणार त्यामुळे अनावश्यक खर्च टाळले पाहिजे अशी सूचना मांडत आपल्या कालावधीत फक्त 4 कोटीत ओव्हरहोलिंगची कामे करून साडेतीन लाखाच्या --- ## प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्कार’साठी निवड - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/para-mallkarajana-ramapapa-shatara-yaca-raja-vakaramasaha-ghataga-aatharasha-shakashhaka-ya-paratashhathacaya-parasakarasatha-navada - **Published**: 2026-10-01 11:59 - **Category**: महाराष्ट्र - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा : गोपाळ गडकरी,                                            राज्यस्तरावर पर्यावरण सेवा योजना, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, व्यसनमुक्त जाणीव जागृती यासारख्या विधायक कार्यात राज्यस्तरावर विषयतज्ञ व मार्गदर्शक म्हणून सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आजरा महाविद्यालय, आजरा येथील प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजे समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी प्रा. शिंत्रे यांची निवड झाल्याचे निवडपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. दि. २८ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेल्या निवड पत्रात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणविषयक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे. प्रा. शिंत्रे यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृती, ऊर्जा संवर्धन, बांबू संवर्धन व विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे. समाजात वाढल्यानंतर समाजाला काहीतरी देणे लागते, या जाणिवेतून सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींमध्ये प्रा. शिंत्रे यांचा समावेश असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. परंपरेनुसार लवकरच कागल येथे दिमाखदार राजेशाही सोहळ्यात पुरस्कार वितरण होणार आहे.. प्रा. मल्लिकार्जून रामाप्पा शिंत्रे यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. --- ## आजरा महाविद्यालयात 'ड्रग्ज व अंमली पदार्थांचे धोके' यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न - **URL**: https://www.ramtirthnews.com/news/aajara-mahavathayalyata-daragaja-va-amal-patharathaca-thhaka-yavara-parabthhanapara-vayakhayana-sapanana - **Published**: 2026-10-01 06:38 - **Category**: देश - **Author**: संपादक - गोपाळ गडकरी आजरा : प्रतिनिधीस्थानिक आजरा महाविद्यालय, आजरा येथे अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा आणि १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘ड्रग्ज व अंमली पदार्थांचा धोका: जाणीव-जागृती व समुपदेशन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.व्यसन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून गंभीर सामाजिक प्रश्न : प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रेया कार्यक्रमात व्यसन जाणीव-जागृती अभियानाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले:गंभीर परिणाम : अंमली पदार्थांचे सेवन ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित समस्या नसून त्याचे अत्यंत गंभीर सामाजिक परिणाम भोगावे लागतात.आरोग्य व करिअरची हानी : व्यसनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक स्थैर्याचे मोठे नुकसान होते.आर्थिक नुकसान : व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊन सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळते.सावध राहण्याचे आवाहन : मित्रांचा दबाव, कुतूहल, मानसिक ताण किंवा चुकीच्या संगतीमुळे अनेकदा तरुण व्यसनाच्या आहारी जातात. विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून स्वतः सावध राहून आपल्या मित्रांनाही व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे.निरोगी जीवनशैलीचा अवलंब : शिक्षण, क्रीडा आणि रचनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय राहून प्रत्येक युवकाने समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला पाहिजे.उपस्थिती व संयोजनअध्यक्षस्थान : महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळसूत्रसंचालन : रणजीत पवारआभार प्रदर्शन : राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी रत्नदीप पवारया उपक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.